अहमदनगर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पक्ष श्रेष्ठींसमोर नगर शहरातून आक्रमकपणे उमेदवारी मागितली. पक्षाचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, माजी खा. देविदास पिंगळे यांच्या समोर काळे यांनी नगर शहरातील पक्षाच्या सद्यस्थितीचा पाढाच वाचला.
विद्यमान आ. संग्राम जगताप यांनी आजच्या मुलाखती कडे पाठ फिरवली. त्यांच्या उमेदवारीची मागणी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली. यामुळे शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान माजी महापौर अभिषेक कळमकर यांनीही पारनेर विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय पट काय असेल याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे.
- शेतकऱ्यांच्या खराब अवस्थेला काँग्रेस जबाबदार – मोदी
- राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या…!अकोला @ ४४ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
- …. तर शिवाजीराव कर्डिले अहमदनगर लोकसभेचे खासदार झाले असते ! तुम्हाला माहीत आहे हा इतिहास ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ लोकप्रिय योजनेत एकदा गुंतवणूक करा अन आयुष्यभर पैसे कमवा ! व्याजाच्या स्वरूपात मिळणार लाखों रुपये
- पहिल्याच दिवशी शिर्डीसाठी 31 अन नगर दक्षिणसाठी 42 अर्जांची विक्री; खा. सुजय विखे, तनपुरेसह ‘यांनी’ घेतलेत अर्ज