Ahmednagar NorthBreaking

मोटारसायकल विहिरीत पडल्याने दोन तरुण ठार

संगमनेर :- तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात मोटारसायकलसह विहिरीत कोसळून दोन युवक ठार झाले. संतोष भास्कर दिघे (वय २२, रा. तळेगाव दिघे) व नामदेव तुकाराम वर्पे (वय २३, रा. भागवतवाडी) अशी या दुर्दैवी युवकांची नावे आहेत.

गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास बोडखेवाडीनजीक ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने तळेगाव दिघे परिसरावर शोककळा पसरली.

याबाबतची अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास संतोष भास्कर दिघे व नामदेव तुकाराम वर्पे हे दोघे युवक मोटारसायकलवरून घराकडे येत होते.

बोडखेवाडीनजीकच्या रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने ते मोटारसायकलसह लगतच्या विहिरीत कोसळले. मोठा आवाज झाल्याने नजीकचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

मात्र विहिरीत पडून जबर मार लागलेल्या संतोष दिघे या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी संतोष दिघे याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला.

जबर जखमी झालेल्या नामदेव वर्पे यास विहिरीतून बाहेर काढत उपचारार्थ प्रथम संगमनेर येथे व त्यानंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र नामदेव वर्पे याचा शुक्रवारी अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

सहाय्यक फौजदार दत्तात्रय पानसरे, हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, पोलीस नाईक बाबा खेडकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, माजी उपसरपंच बाळासाहेब दिघे, सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक दिघे, भाऊसाहेब दिघे, शशिकांत जगताप, अर्जुन दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबर दिली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button