Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

भूमिपुत्र संघटनेची माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरासमोर घोषणाबाजी

श्रीगोंदा ;- साईकृपा व कुकडी साखर कारखान्यानी श्रीगोंदा, आष्टी,दौंड,जामखेड,कर्जत, या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे करोडो रुपयाचे बिल थकवले असून, यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे व ऊस वाहतूकदारांचे थकीत पैसे, साखर कामगारांचे थकीत वेतन लवकर देण्यात यावे, या मागणीसाठी साखरसाम्राट आणि पारंपरिक राजकीय नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते व श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप याच्या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी

साखरेच्या घरात भाकरीचा ठिय्या आणि माय बापाहो आमची चूल विझु देऊ नका..अशी टॅगलाईन देत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्र करीत या शेतकरी हिताच्या प्रश्नासाठी पाचपुते यांच्या माऊली व जगताप यांच्या निवासस्थाना समोर तिव्र बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाठींबा दिला आहे.

यावेळेस भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमोल उगले, सामजिक कार्यकर्ते साईनाथ घोरपडे, भूमिपुत्र शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा संघटक संतोष वाबळे भूमिपुत्र शेतकरी संघटना पारनेर तालुका प्रवक्ते राजू रोकडे, सिताराम देठे, उद्योजक गोरख वाळुंज, रावसाहेब झांबरे, संदीप जाधव, उद्योजक भरत औटी, सचिन आंधळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

भूमिपुत्रचे संतोष वाडेकर यांनी जर या आजी माजी आमदारांनी शेतकऱ्यांचे थकलेले ऊसाची रक्कम न दिल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल.

अमोल उगले यांनी यावेळेस शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव न ठेवल्यास आम्ही जहाल पवित्रा घेऊ व निर्णय लवकर न केल्यास आम्ही संपूर्ण भूमिपुत्र शेतकरी संघटना टिळक भोस यांच्या सोबत आंदोलनात सहभागी होऊ असे सांगितले.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात त्यांच्या माऊली या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button