अहमदनगर : – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना त्यांच्या पक्षाचे ‘महिला धोरण’ अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
याच मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्सीखेच सुरू असताना आता प्रदेशाध्यक्ष चाकण याही महिलांची बाजू घेऊन गुंड यांच्या मागे उभ्या रहिल्या आहेत.
चाकणकर आज नगरला आल्या होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले, ‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी जास्तीतजास्त जागा आम्ही मागणार आहोत व कर्तृत्ववान महिलांना संधी देणार आहोत.
नगरच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी उमेदवारी मागितली असली तरी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. मात्र, आपण महिलांना संधी द्यावी, अशी शिफारस वरिष्ठांकडे करणार आहोत. असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार का? यावेळी किती वाढणार DA ? पहा…
- शुक्र ग्रह देतो पैसा, प्रसिद्धी आणि नाव… ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक असतात प्रचंड भाग्यवान!
- MBA करायचंय?, मग भारतातील टॉप-5 MBA कॉलेज आणि त्यांची फी, प्रवेशप्रक्रिया, पॅकेज सगळं काही इथे जाणून घ्या!
- पाथर्डीतील मुख्य रस्त्यावर गटारीचं पाणी, उपजिल्हा रुग्णालय परिसर दुर्गंधीने हैराण; सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष
- जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांची श्रीगोंदा तहसील कार्यालयात झाडाझडती, कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष देण्याच्या सूचना