‘रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री’ !

कर्जत :- ‘रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील, मात्र यासाठी जनतेने त्यांच्यामागे उभे राहण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन अरण येथील सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांनी केले.

पंढरपूर येथे आषाढीवारीला जाऊन आलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व वारकऱ्यांचा व दिंडी प्रमुखांचा सृजन वैष्णव पूजन कार्यक्रम येथील श्रीराम मंगल कार्यालयात झाला. कार्यक्रंमाचे अयोजन संस्थेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले होते.

या वेळी मनोहर महाराज म्हणाले,  ‘राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे, आणि हेच नेहमी पवार कुटुबांने दाखवून दिले आहे. याउलट इतर राजकारणी या पेक्षा उलटे करतात. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेणे ही बाब पुण्याची आहे. अशा वारकऱ्यांची पूजा करणे हे अनेक जन्माचे पुण्य आहे.

सर्व वारकऱ्यांचा आणि आमचा आशीर्वाद रोहित पवार यांच्या पाठिशी आहे. रोहित पवार युवक आहेत, आणि असे असतानाही त्यांचे धर्मकार्यामधील कार्य खूपच चांगले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. 

Related Posts
Loading...

रोहित पवार म्हणाले, ‘अतिशय खडतर प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन घेणाऱ्या वारकऱ्यांचे चरणस्पर्श म्हणजेच विठ्ठलाच्या पायाला स्पर्श केल्यासारखे वाटते. आम्ही बारामतीमध्ये असे अनेक उपक्रम करतो. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. हे आपले कर्तव्य आहे. या सर्वांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, धाकटी पंढरीमध्ये हा योग आला आहे.

या वेळी अदमापूर येथील बाळू मामा यांचे वंशज मनोहर महाराज व अरण येथील सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, दयांनद महाराज कोरेगावकर, प्रकाश महाराज जंजीरे, भाकरे महाराज, जाधव महाराज यांचे सह दोन्ही तालुक्यातील अनेक किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी दिंड्यांचे प्रमूख गोदडमहाराज मंदिराचे पुजारी यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.