आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत

Published on -

पारनेर :- तालुक्याचे शिवसेनेचे आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात नगर आणि पारनेर तालुक्यातील पदाधिका-यांसह शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचला.

त्यानंतर ठाकरे यांनी आ. औटी यांच्यावर नाराजी व्यक्त करत समज दिला. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पारनेर तालुक्यात शिवसेनेचे विजय औटी हे गेल्या २० वर्षापासनू आमदार आहेत. आ. औटींच्या कारभारामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे दिग्गजांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

सबाजी गायकवाड, बी. एल. ठुबे, विश्वनाथ बांडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नीलेश लंके शिवसेनेतून बाहेर पडले. या नेत्यांचे शेकडो कार्यकर्ते सेनेपासून दूर गेले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आ. औटींबरोबर शिवसैनिकांची फौज कमी दिसण्याची शक्यता आहे.

औटींवर नाराज झालेले शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांचे शिष्टमंडळ मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. औटी यांच्या कामाविषयी तक्रारीचा त्यांनी पाढा वाचला.

त्यानंतर ठाकरे यांनी आ. औटी यांना समज देत यापुढे शिवसैनिकांचे कामे करा असा आदेश दिला. पदाधिका-यांसह शिवसैनिकांनी औटींच्या विरोधात बंड पुकारल्याने त्यांचा काय परिणाम होणार हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!