नगर – दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यामध्ये जनावरांना नियमित चारा मिळतो का? याची अचानक तपासणी करण्यात आली.
त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सादर करून त्यांनी जिल्ह्यातील 91 चारा छावण्यांना 3 लाख 79 हजार 895 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कृषीविभागाचे अधिकारी यांच्या पथके तैनात केली होती.
या पथकाने जिल्ह्यात सुरु असलेल्या छावण्यांना अचानक भेट देवून त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला.
त्यानुसार 91 चारा छावण्यांना पावनेच्यार लाखांचा दंड करण्यात आला आहे. दुष्काळी भागात पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण मार्च अखेर 504 चारा छावण्या सुरु होत्या. आता मात्र जिल्हात 234 चारा छावण्या सुरु असून, 1 लाख 34 हजार 38 जनावरे आहेत.
या जनावरांना छावणी मध्ये दिले जाणाऱ्या पाण्याचे नमुणे तपासणी केली जाते का?, दाखल जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत नियमित पणे तपासणी होती का?, व आवश्यक ते औषधोपचार केले जाते का, जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही.
नकाशा प्रमाणे छावणीची रचना केली आहे काय?. आजारी जनावरांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे का?. छावणी मालकाने स्वतंत्र विद्युत मिटर घेतले आहे का? प्रत्येक जनावरांची व चारा वाटप ठिकांनचा व्हिडीओ चित्रीकरण होण्यासाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे का?
छावणी परिसरात धूम्रपाण होत असल्याचे आढळूण आले आहे का तसेच जनावरांना पशुखाद्य दिले जातेका?, शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे चारा वाटप केली जाते का? याबाबत तपासणी करण्यात आल्या होत्या.
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला