अहमदनगर :- दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्याने त्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
बाबुर्डी बेंद येथे शनिवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला आहे. या ग्रामसभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्याबाबतचे विषय घेण्यात आले.
मागील तीन-चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. शेतीसाठी कर्ज काढून केलेला खर्च वाया जात आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. ग्रामीण भागात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने सरसकट दीड लाखांपर्यंची कर्जमाफी द्यावी, अशी सूचना निलेश चोभे यांनी मांडली. त्यास सरपंच दिपक साळवे यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच अण्णा चोभे यांच्यासह सर्वांनीच त्यास पाठिंबा दर्शविला.
- 50MP कॅमेरा, 128GB स्टोरेज आणि 5G स्पीड! अवघ्या ₹10,000 च्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ टॉप-3 स्मार्टफोन्स
- डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; मात्र लंकेंकडून श्रेय ‘लाटण्याचे’ राजकारण सुरूच !
- 2008 ते 2025 दरम्यान सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 बॉलीवूड चित्रपट; पाहा यादी!
- बिजनेस ठप्प झालाय, पैशांची आवकही थांबलीये?’हा’ वास्तु उपाय तुमचं नशिबच बदलेल!
- घरबसल्या फक्त 2 मिनिटांत कळणार ₹2000 खात्यावर आलेत की नाही?, ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी!