शरीरसुखाची मागणी केल्याने महिलेने घेतले पेटवून

कोपरगाव : तालुक्यातील मंजुर परिसरात राहणारी विवाहित महिला सौ. शोभा मधुकर पायमोडे, वय ३५ हिच्याकडे आरोपी शंकर पांडुरंग पायमोडे, वय ४० रा. मंजूर हा नेहमी वाईट नजरेने पाहत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

त्याच्या त्रासाला कंटाळून शोभा मधुकर पायमोडे या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला.

Related Posts
Loading...

याप्रकरणी मयत शोभा यांचे पती मधुकर रामनाथ पायमोडे यांनी काल कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी शंकर पांडुरंग पायमोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नीस आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी पो.नि. लोखंडे यांनी भेट दिली. आरोपी शंकर पायमोडे याला रात्री अटक करण्यात आली. पो. स ई शेळके हे पुढील तपास करीत आहेत.