Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

एमआयएम अहमदनगरची घराणेशाही संपविणार

अहमदनगर :- ज्यावेळी मी पहिल्यांदा अहमदनगरला आलो होते, त्यावेळी एखादी व्यक्तीही एमआयएमची जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हती. परंतु आता दिवस बदलले. आज सर्व तरुण पिढी या पक्षासोबत येण्यासाठी उत्सुक आहे.

सर्व मुस्लिम, दलित व वंचित समाज ऑल इंडिया मजलिसे ए इत्तेहादुल मुस्लिमिनचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी व वंचित बहुजन आघाडीचे सर्वोसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला मानत व पसंत करायला लागले आहे.

आणि महाराष्ट्रातील युवा या दोन्ही नेत्यांचे खांदे बळकट करण्यासाठी जीवाचे राण करत आहेत, कोठला मैदान येथे एमआयएम-वंचित आघाडीची जाहीर सभा झाली.

यावेळी शेर-ए-औरंगाबाद जावेद कुरेशी प्रमुख वक्त म्हणून बोलत होते. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अंजना गायकवाड, सदस्य शब्बीरभाई, बीड जिल्हाध्यक्ष निजाम सरकार, भारिप जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.अशोक सोनवणे, वंचितचे डॉ.सुधीर क्षीरसागर,

नगरसेवक हाजी इसाक, भाऊसाहेब ताजणे, युवा प्रभारी मौलाना उमर, परम मॅडम , जिल्हा उपाध्यक्ष परवेज सय्यद, तौसिफ मणियार, उत्तर जिल्हाध्यक्ष इमरान देशमुख, कर्जत तालुकाध्यक्ष डॉ.अन्सार, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शाहुल शेख,

शमशेर सर, सााजीद मिर्जा, तनवीर पठाण, बन्नोबी शेख, इमरान दारुवाला, अकिल सय्यद, नदिम शेख, अर्शद शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेझ अशरफी, शहराध्यक्ष हाजी जावेद शेख आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना जावेद कुरेशी म्हणाले, औरंगाबादमध्ये जो इतिहास घडला तो फक्त औरंगाबादच्या जनतेने व अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर व बॅ.असुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाला मानले. तमात जनतेने खासदार इम्तीयाज जलील यांना निवडून आणण्याचा संकल्प केला होता, त्यामुळे हे शक्य झाले.

तसाच इतिहास अहमदनगर मध्येही घडू शकतो व येणार्‍या विधानसभेत घडणार आहे. इथली घराणेशाही संपवणार. गेले 70 वर्षे त्यांच्यासाठी जिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यामुळे ते खासदार, आमदार, महापौर झालेत. परंतु त्यांच्या सोईनुसार ते एक दिवसात पक्ष बदलतात.

कधी कोणी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करतो तर कधी राष्ट्रवादीमधून सेनेच्या संपर्कात असतात. जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणायचे ते सत्तेसाठी पक्ष बदलतात आणि सामान्य जनतेचा विश्‍वासघात करतात. भारतातील मुस्लिम, दलित हा धर्मनिरपेक्ष होता, आहे आणि कायम राहणार.

मुस्लिम, दलित आणि तमाम वंचितांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आणि बॅ.ओवेसी यांना आपला नेता मानला आहे आणि कायम राहणार. येणार्‍या विधानसभेत ज्यांना उमेदवारी देतील, त्यांना आपल्याला जिंकून आणायचे व महाराष्ट्राचा भविष्य अ‍ॅड.प्रक़ाश आंबेडकर, बॅ.ओवेसी आणि खा.इम्तियाज जलील यांच्या हातात सोपावायचा आहे.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा.इमतेयाज जलील खासदार झालेत ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र आल्यामुळे. चापलुसी करणार्‍यावर ही जावेद कुरेशी यांनी टिका केली व मजलीस सोबत जुडण्याचे व एकत्र येण्याचे आवाहन केले.

पश्‍चिम महाराष्ट्र प्रवक्ते धर्मराज साळवे यांनी जनतेला संबोधित करुन आपल्याला जर आपले अस्तित्व कायम ठेवायचे असेल व शासक व्हायचा असेल तर त्यांना आंबेडकर व ओवेसी यांच्या सोबत यावे. खासदार आणि आमदारांची कामे काय असतात हे बघायचा असेल तर त्यांनी हैद्राबादला जाऊन बघावे की हे दोन वाघ तेथील जनतेसाठी काय करतात.

यावेळी कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते जबाबदारी पत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी, शहर अध्यक्ष हाजी जावेद शेख, कदीर शेख, सुफियान शेख, ताहेर शेख, अनस शेख, आसिम शेख, शहबाज सय्यद, अमिर खान, मो.हुसेन, तौसिफ शेख, अबरार शेख, शहानवाज तांबोळी, समीर बेग, मुसेद सय्यद, आदिंनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मुन्नवर अहमदनगरी यांनी तर आभार नदीम शेख यांनी मानले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button