कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्स लावले आहेत.
यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा कालावधीनिहाय लेखाजोखा फ्लेक्समधून मांडला आहे.
“काम दमदार राम शिंदे पुन्हा आमदार’ अशी टॅगलाईन फ्लेक्सवर झळकत आहे. गावागावातील दर्शनी भागात मोठ्या आकाराचे हे फलक लावण्यात आलेले आहेत.
फलक लावल्यापासून ग्रामस्थांनी फलकावरील विकास आणि गावात प्रत्यक्ष झालेली कामे याची शोधाशोध करायला सुरुवात केली आहे.
कामांचे भूमिपूजन झाले मात्र काम सुरू नाही, अर्धवट अवस्थेतील बंद कामे, निकृष्ट दर्जाची कामे अशा अनेक मुद्द्यावर गावात चर्चा सुरू आहे.
काही गावात तर ग्रामस्थांना झालेल्या काही कामांचा अद्यापही तपास लागलेला नसल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून दिसत आहे.
- सलमान खान-संजय दत्तमुळे बनलं एका फ्लॉप अभिनेत्याचं करिअर, 2004 चा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्ही पाहिलाय का? वाचा पडद्यामागील कहाणी
- महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-6 खेळाडूंची यादी, नंबर-1 वर भारताची झुलन गोस्वामी!
- फक्त ₹200 मध्ये कॉलिंग, डेटा, OTT अॅक्सेस आणि बरंच काही; Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट बजेट फ्रेंडली प्लॅन!
- ‘या’ 10 सवयी आत्ताच बदला, अन्यथा तुमचा फ्रीजच बनू शकतो टाइम बॉम्ब! एका झटक्यात घर जळून खाक होईल
- नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? ‘या’ सरकारी स्कीम्स देतील 10 लाखांपासून 10 कोटींपर्यंत लोन; जाणून घ्या संपूर्ण माहिती!