श्रीरामपूर :- शहरातील गोंधवणी रोड वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्ष वयाच्या तरुणीला मागेरी शिवगाव येथे सोडण्याचा बहाणा करुन दुचाकीवर बसवून श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरातील दुर्गानगर भागात एका पत्र्याच्या खोलीत नेवून तेथे तिला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला.
दि. ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान गोंधवणी वार्ड नं. १ वसुतगिरणी जवळील पत्र्याच्याखोलीत वेळोवेळी हा बलात्कार झाला. पिडीत २० वर्षाच्या तरुणीने याप्रकरणी काल श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी असिफ चांद शेख, रा. गोंधवणी, वार्ड १. श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा पिडीत तरुणीचा नात्याने दीर आहे.
घटनास्थळी पोनि बहिरट, सपोनि पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून आरोपी असिफ चांद शेख याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार तरुणीने धाडस करत पोलिसांत फिर्याद दिल्याने समोर आला.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!