अहमदनगर महाविद्यालयात जर्मन भाषेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 नगर – अहमदनगर महाविद्यालयात प्राचार्य  आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते जर्मन भाषेच्या  आंतरराष्ट्रीय परिक्षेत यशस्वीझालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र  देवुन सत्कार करण्यात आला. 

काळाची गरज ओळखुन विद्यार्थ्यांना परदेशी भाषा कमीतकमीमुल्यामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात जर्मन भाषा वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या जर्मन भाषावर्गामध्ये  अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

 यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले कि,  विद्यार्थ्यांचे यश हे फक्त त्यांनी मिळवलेल्या पारंपारीकपदवीवर अवलंबुन नसते. पदवी व्यक्तीरिक्त जर एखाद्या विद्यार्थ्याकडे अधीकचे ज्ञान असेल तर तो नक्कीच इतरांच्या पुढेजातो. 

महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतात ते सर्वच एकाच स्तरावर शिक्षण घेत असतसत.शिक्षणपुर्ण केेल्यानंतर जेव्हा विद्यार्थी खर्‍या व्यवसायीक जगात जातात तेव्हा मात्र त्यांच्या प्रगतीचा वेग हा त्यांनीमिळवलेल्या अधीकच्या इतर ज्ञानावर अवलंबुन असतो, असे ते म्हणाले.

     या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेत विविध संभाषण करुन दर्शकांना मंत्रमुग्ध केले. नवीन भाषा शिकायलावयाच्या मर्यादेत न मोजता, शालेय विद्यार्थ्यांनपासून त्यांच्या पालकापर्यंत कोणीही जर्मन भाषा शिकू शकतात, असाप्राध्यापकांचा दावा आहे.

     अहदमनगर महाविद्यालयामध्ये डॉ.कमलाकर भट आणि दिव्या शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन भाषेचे विविधसर्टिफिकेशन कोर्सˆचालवले जातात. जर्मन भाषा ही संपुर्ण युरोप खंडात बोलली जाते. युरोप खंडातील शिक्षण व जागतिकबाजारपेठ भारतीय विद्यार्थ्यांना स्वत:कडे आकर्षित करत आहे. 

म्हणूनच 15 ऑगस्टचे अवचित्य साधून अहमदनगरमहाविद्यालयाने सर्व नगरकरांसाठी फी मध्येही सवलत दिली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत आपली नावेनोंदवुन प्रवेश निश्‍चित करावा. अधिक माहितीसाठी डॉ.कमलाकर भट (मो.9326636759) आणि शुभम शिराळकर(मो.8208078160) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment