Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

जर पिचडांचं “सांम्राज्य” उखडुन फेकायचं असेल तर या ‘त्रिकुटांना’ एकत्र यावचं लागेल !

“अकोले” तालुक्‍याला डाव्या चळवळीचा इतिहास आहे. मात्र, २०१४ ला राज्यात व केंद्रात सत्तापालट झाला आणि डाव्या विचारांची धार आता बोथट होऊ लागली असल्याने आणि उजवा विचार रुजू लागल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. याचा अपरिहार्यपणे परिणाम माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्यावर होईल असं वाटत होतं परंतु स्वतः पिचड पिता-पुत्र भाजप मध्ये प्रवेश करुन तालुक्यातील विरोधकांना कोंडीत पकडले आहे.

जवळपास पाच दशके सत्ता गाजवणाऱ्या पिचड यांनी सतर्क होऊन आपलं साम्राज्य टिकण्यासाठी आज पर्यंत ज्यांच्यावर टीकेची झोड उचलली होती त्याचं भाजपामध्ये प्रवेश करुन अकोले तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी दिली. परंतु स्वतः ला पुरोगामी विचारांचे समजनारे पिचड तालुक्यात हा उजवा विचार उखडून फेकून देतात का? हे पाहणे भविष्यात तरी रंजक ठरणार आहे.

देशाला प्रजासत्ताक बनवणाऱ्या अनेक लढाया झाल्या पण आदिवासीबहुल असणाऱ्या या तालुक्‍याने खरा क्रांतीकारी लढा दिला तो राघोजी भांगरे या आद्य क्रांतिकारकाच्या रुपानेच आणि हा लढा झिरपत झिरपत पोचला तो जंगलच्या सत्याग्रहापर्यंत. मामलेदाराला जाळण्यापर्यंत. देशाला स्वातंत्र्य १५  ऑगस्ट १९४७ ला मिळाले,व 1952 सालच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे गोपाळा श्रावणा भांगरे यांचे पुतणे यशवंतराव भांगरे यांनी नवाळींना घरी बसवले. 


पण चळवळीच्या तालुक्‍याने 1967 साली भाकपच्या कॉ. बी. के. देशमुख यांना विजयी करुन आपला चळवळीचा बाणा दाखवून दिला. पुन्हा 1972 साली यशवंतराव भांगरे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या व 1977 साली कॉंग्रेस (एस) च्या उमेदवाराबरोबर विजय हशील केला. मात्र 1980 ते 2014 पर्यंत ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्यात प्रत्येक वेळेस पिचड यांनी सत्तेचा मुकुट स्वतः च्या शिरपेचात रोवत गेले. 1980 ते 1995 पर्यंत मधुकरराव पिचड हे कॉंग्रेसचे उमेदवार राहिले तर 1999 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आणी या इतिहासाच्या मागोव्यातच ‘भांगरे-पिचड’ हा राजकीय संघर्ष कायम टिकला असल्याचे दिसले आहे.

1952 ते 1972 या काळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कॉंग्रेसला कायमच मताधिक्‍य कमी मिळाले. त्यामुळे 1977 सालापासून 1999 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघ नाशिकला जोडला गेला. मात्र, आणीबाणीच्या काळात व नंतर 1980 च्या निवडणुकीत तालुक्‍याने कॉंग्रेसला दूर ठेवले. नंतर कॉंग्रेसचा विचारच येथे लोकसभेसाठी रुजला हा अलीकडचा इतिहास आहे. 1990 साली शिवसेनेकडून विधानसभेला उमेदवार मिळाले. त्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेस असा सामना रंगू लागला. नंतरच्या घडामोडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द शिवसेना असा सामना सर्वांना भावला. तर 2014 सालच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारीत कमळ’ चिन्ह उमलले आणि 15 वर्षे आघाडीची सत्ता असणाऱ्या अकोले तालुका पंचायत समितीवर कोणालाही अपेक्षित नसणाऱ्या शिवसेनेला सत्तेचा साज चढवण्याची वेळ राष्ट्रवादी कॅांग्रेसवर आली.

2012 साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस 10 व कॉंग्रेस 2 असा 12 गणांत विजयी झाली होती तर जिल्हा परिषदेच्या सहापैकी 5 गटांवर राष्ट्रवादी व 1 गटात कॉंग्रेस विजयी झाली होती. आणि हा हा म्हणता बुथवर माणसे नियुक्तीस न मिळणाऱ्या शिवसेना पक्षाला 2017 च्या निवडणुकीत घसघशीत यश मिळाले. अकोले पंचायत समितीच्या 12 गणांत राष्ट्रवादी कॉंग्रेस – 4, 
शिवसेना – 4 
भाजपा – 4 
असे संख्याबळ राहिले तर जिल्हा परिषदेच्या सहा गटांत 
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2 
भाजपा – 3 
शिवसेना – 1 


असे चित्र म्हणजे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्याला त्या वेळी मोठा धक्काच होता. मग पंचायत समिती हातची जाईल म्हणुन पिचडांनी राजकिय खेळीत भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने ही सत्ता शिवसेनेच्या हाती सुपूर्द केली,व ठाकर समाजाचा जनाधार लाभलेला युवा नेता मारुती मेंगाळ यांना शिवसेनेने पंचायत समितीवर सभापती म्हणून विराजमान केले.

या सर्व घडामोडी पाहता शिवसेने ला मोठा भाऊ समजनारी भाजपा सेनेचा हात धरुन तालुक्‍यात अस्तित्व निर्मान करु पाहणाऱ्या भाजपला जालिंदर वाकचौरे यांच्या रुपाने एक युवा चेहरा मिळाला तर डोंगरदऱ्यात 2016 सालच्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांच्या रुपाने लढावू बाण्याचा व लोकनेता उमेदवार मिळाला. परंतु यात कोंडी झाली ति आशोक भांगरे यांची.
२०११ च्या जनगनने नुसार अकोले तालुक्यातील लोकसंख्या हि साधारण,
हिंन्दु- २७९२७६(९५.६६टक्के), 
मुस्लिम- ६९७०(२.३९ टक्के),
ख्रिश्चन-१२३(०.०४टक्के),
शिख-६२(०.०२ टक्के),
बुध्दिष्ट-४५९३(१.५७ टक्के)
जैन- ५०६(०.१७टक्के)
व इतर-१४(०.०टक्के) अशी आहे.
परंतु अकोले विधानसभा मतदार संघ हा ST(आदिवासी) साठी राखीव आहे व लोकसभा SC साठी राखीव आहे त्या मुळे इथे SC/ST या दोन घटांची मतं निर्णायक आहेत.
SC – १३,३२३(४.६ टक्के) आहे तर 
ST- १३९,७३०(४७.९ टक्के) आहे. परंतु २०१४ साली प्रत्येक पक्ष हा स्वबळावर विधानसभेला सामोरे गेला आणी पिचडांच्या विरोधकांच्या मतांची विभागणी झाली व त्यात वैभव पिचड विजयी झाले.उमेदवारांची नावे पुढील प्रमाने आहेत.


वैभव मधुकर पिचड (राष्ट्रवादी)-६७६९६
तळपाडे मधुकर शंकर (शिवसेना)-४७६३४
अशोक यशवंत भांगरे (भाजप)-२७४४६
सतिश नामदेव भांगरे (कॅांग्रेस)-४३९१
नामदेव गंगा भांगरे (माकप)-११८६१ 


परंतु २०१९ ची विधानसभा पहाता पिचडांच्या विरोधात निवडणूक लढणारे आज निराशेच्या छायेत आहेत.स्वता पिचड भाजपा मध्ये गेल्या मुळे शिवसेनेचा गड असनारा अकोले मतदार संघ आता भाजपच्या ताब्यात तर जानार नाहि ना हि धाकधुन शिवसेनेच्या नेत्यांना आहे.त्यात सतिश दादा भांगरे,मारूती मेंगाळ हे प्रमुख उमेदवारिचे दावेदार आहेत व भाजपा मधून डॅा.किरण लहामटे व आशोक भांगरे हे देखील प्रमुख दावेदार आहेत परंतु पिचड आपले मुख्य विरोधक आहेत त्या मुळे ते जर भाजप मध्ये असतील तर मि त्यांच्या सोबत काम करणार नाही म्हणत त्यांनी भाजपाला रामराम ठोकला,पण आशोक भांगरे आज एकटे पडले आहेत.

काल जागतिक आदिवासी दिन संपुर्ण देशात साजरा होत होता त्याच धर्तिवर अकोले तालुक्यात देखिल खुप मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आल व त्याचं निमित्ताने अकोले तालुक्यातील तिन युवा नेते डॅा.किरण लहामटे,सतिशदादा भांगरे,व मारुती मेंगाळ हे एका मंचावर दिसले.परंतु हे फक्त आदिवासी दिनाचं निमित्त होतं जर या तिघांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले तर पिचडांना जिंकण्या पासून कुनिही रोखु शकनार नाही.
जर पिचडांचं “साम्राज्य” उखडुन फेकायचं असेल तर या ‘त्रिकुटांना’ एकत्र येऊन एक समर्थ पर्याय द्यावा लागेल.अन्यथा आज पर्यंत जे घडतं अालं आहे या पुढेही हाचं इतिहास लिहला जाईल.
आपन तिघेही युवा आहात आपल्याकडे युवा वर्ग खुप मोठ्या आशेने पाहतो आहे.त्यांचा हिरमोड होनार नाही याची काळजी घ्याल हिचं अपेक्षा.

– सुनिल वसंत भद्रिके.
तळे,ता.अकोले,जि.अ.नगर.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button