महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत पतीस लाथाबुक्क्याने मारहाण

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील विवाहित तरुण महिला सरपंच यांच्या घरासमोर जावून आरोपी बाळासाहेब आबाराव घोगरे यांनी मागील तीन महिन्यापूर्वीच्या जलसंधारण कामाच्या वादावरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केली. 

तेव्हा सरपंच महिलेचे पती आरोपी बाळासाहेब घोगरे याला म्हणाले की, तू घाण – घाण शिवीगाळ करु नको. असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आरोपीने  सरपंचास मी तुझा…आहे.तुझ्याजवळ…असे म्हणत अश्लिल शब्द वापरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. 

अशा पद्धतीने मोठमोठ्याने उच्चारुन सरपंच महिलेकडे पाहून अश्लिल अंगविक्षेप करून सरपंच महिलेच्या पतीला लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

AMC Advt

याप्रकरणी पिडीत महिला सरपंचांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाळासाहेब आबाराव घोगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि खान यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ बर्डे हे करीत आहेत. या घटनेतून महिला पदाधिकारी कशा असुरक्षित आहेत हे समोर आल्याचे म्हटले आहे.