Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

राज्यातील पूर परिस्थिती बाबत रोहित पवारांची भावनिक पोस्ट

अहमदनगर :- राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूर परिस्थिती बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी लिहिलेय कि ”जेव्हा जेव्हा मी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात येतो तेव्हा इथे असणाऱ्या नद्या आणि या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक संपन्नतेच कौतुक वाटतं. पण कालपासून या परिसरात फिरताना यापुर्वी आपण इतकी आनंदी पाहिलेली माणसं हिच का? असा प्रश्न पडत आहे.”

मी फक्त पुरामुळं किती नुकसान झालं आहे, किती घरे पाण्याखाली आहेत, किती लोकांचे संसार बुडले आहेत हे सांगू शकतो पण त्यांच दुख: सांगू शकत नाही, हे दुख: खूप मोठ्ठ आहे आणि त्यावर मात करत इथली लोक लढत आहेत.

कराड परिसरपासून रेठरेहरणाक्ष, रामानंदनगर, भिलवडी, वसगडे परिसरात काल भेट देण्यात आली. आजही मी आणि आदरणीय साहेब सांगलीतच असून लोकांच्या भेटी घेत आहोत. सरकारी शाळा, महाविद्यालयात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आलेल्या लोकांकडे पाहून खिन्न वाटतं.

या पुरग्रस्त नागरिकांसाठी खरे हिरो कोण? अस विचारलं, तर मी सांगेल इथली लोकं. हे लोकं एकमेकांना आधार देत पुरात अडकलेल्यांना बाहेर काढत आहेत. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते रात्रंदिवस मदत करत आहेत.

प्रशासकिय अधिकारी, सैन्यदल झटत आहेत. शासकीय पातळीवर योग्य मदत झाली का तर नाही हि वस्तुस्थिती आहे. सरकारने ज्या प्रमाणात फोर्स वापरायला हवी होती ती वापरण्यात आली नाही. जबाबदारीने काम करण्याच्या वेळी सरकारचे मंत्री इथे पुरपर्यटन करण्यास आल्यासारखे वागले. लोकांसोबत बोलताना तो असंतोष पदोपदी जाणवतोय.

मला आठतय दुष्काळाच्या काळात सांगलीतून लातूरला रेल्वेने पाणी देण्यात आलं होतं. आज त्याच सांगली कोल्हापूर परिसरासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे.

भेदभाव सोडून प्रत्येकजण लढतोय. पाणी उतरल्यानंतर ज्यांची घरे पुर्णपणे बुडाली त्यांना किल्लारीप्रमाणे घरे बांधुन देता येतील का, इथे असणाऱ्या तरुणांच्या भवितव्याबाबत काही तरतुद करता येवू शकेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणं गरजेचं ठरणार आहे.

कालपासून आदरणीय साहेबांच्या विचारांनी शक्य ती मदत या भागात करण्यात येत आहे. कर्जत,जामखेड परिसरातून माझ्यासोबत आलेल्या मित्रमंडळींमार्फत, पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत हि जबाबदारी उचलण्यात येत आहे.

आपण केलेली मदत कोणाला सांगू नये अस म्हणतात, पण आज प्रत्येकांने पुढे येण्यासाठी जबाबदारीने या गोष्टी सांगु वाटतात. आपण एकत्र येवूया आणि या वाईट काळातून मार्ग काढुया.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button