नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल