श्रीरामपूर :- विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून तीच्या पतीस पाठविले, तसेच पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील घुमनदेव येथील एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबत तालुका पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की घुमनदेव येथील राहुल यननाथ गायकवाड (वय २९) या तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकले तसेच महिलेच्या पतीस व इतरांना पाठविले.

विवाहितेस धमकी देऊन पैशांची मागणी केली. या आरोपावरून गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२०/२०१९ प्रमाणे भा.दं.वि. कलम ३५४ (ड), ३८५, ५००, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आर. एस. पवार हे करीत आहेत.
- सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ‘या’ काळातील 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी मिळणार !
- दम्याच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्यावी ‘ही’ खबरदारी, अन्यथा वाढू शकतो मोठा धोका!
- पृथ्वीवर दुहेरी संकट, हवामान बदलामुळे हिमनद्या संपतील अन्…; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा!
- भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांची ‘ही’ यादी वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! ब्रह्मोस ते तेजस, सगळं येथे जाणून घ्या!
- फक्त भारतच नाही, ‘या’ देशांमध्येही गुंजतो ‘हर हर महादेव’चा जयघोष! जाणून घ्या परदेशातील प्रसिद्ध मंदिरं