झोप येत नसेल तर व्हा सावध, तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

न्यूयॉर्क : सध्याच्या प्रचंड ताणतणावाच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे झोपेचे गणित कोलमडते व त्यांना वेळेवर झोप येत नाही.

अशा अनिद्रेच्या समस्येला तोंड देत असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाच्या आजारांचाही धोका वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनानुसार, अशा लोकांमध्ये ह्रदयाचे ठोके थांबण्याची आणि पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

जगभरात सुमारे ३० टक्के लोक अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काही अध्ययनांतूनही अनिद्रा व ह्रदयाचे आजार यांच्यातील संबंध दिसून आलेला आहे. या ताज्या अध्ययनादरम्यान वेगवेगळ्या संशोधनांमध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे १३ लाख लोकांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले होते.

त्यामध्ये शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, अनिद्रेशी संबंधित एक अनुवांशिक घटक ह्रदयाचे आजार आणि पक्षघाताच्या धोक्याचे कारण ठरतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, झोप एक अशी सवय आहे, ती खाणेपिणे आणि अन्य सवयींमध्ये बदल करून सुधारली जाऊ शकते..

Leave a Comment