पाथर्डी :- वंजारींना संधी देऊन राजळे कुटुंबाने समाजाचा सन्मान केला. आमदार मोनिका राजळेंभोवती जेवढ्या संख्येने वंजारी कार्यकर्ते आहेत, तेवढे तुमच्याभोवती किती मराठा कार्यकर्ते आहेत हे दाखवा.
विक्रमराव आंधळे यांच्या पराभवासाठी पळणाऱ्यांना त्यावेळी जात का दिसली नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते सोमनाथ खेडकर यांनी प्रताप ढाकणेंवर निशाणा साधला. येळी येथे आमदार राजळे यांच्या हस्ते भाटेवाडी रस्त्याच्या भूमिपूजन झाले. यावेळी खेडकर बोलत होते.

रामगिरी महाराज, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गटनेते सुनील ओव्हळ, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, सभापती सुभाष केकाण, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, काशी गोल्हार, अंकुश कासुळे, पुरुषोत्तम आठरे, सुनील परदेशी, बडे गुरुजी आदी या वेळी उपस्थित होते.
सरपंच संजय बडे व त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खेडकर म्हणाले, क्षत्रिय वंजारी परिषदेच्या कार्यक्रमाला प्रभावती ढाकणे उपस्थित राहतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतापरावांचा मतदारसंघात दौरा सुरू होतो.
निवडणूक आली की, लोकांना भावनिक करायचे. नंतर सोयीस्कर तडजोडी करत कार्यकर्त्यांना तोंडघशी पाडायचे, असे उद्योग आता जमणार नाहीत. मंत्री पंकजा मुंडे यांनी बहीण म्हणून मोनिका यांना सर्व ताकद लावून निवडून आणले. तालुका पंकजा यांना नेता मानतो.
आमदारकीसाठी त्यांना पाठबळ दिले जात असेल, तर मोनिकांना जातीच्या नावाने होणारा विरोध म्हणजे पंकजा यांना विरोध आहे. सर्व जाती-धर्माच्या मतदार पंकजा यांच्यावर प्रेम करतो. गोरगरिबांची मने पैशाने जिंकता येणार नाहीत.
तुम्ही कितीही प्रयत्न केला, तरी भाजपची दारे बंद आहेत. मी तालुकाध्यक्ष असताना भाजपमधून तुमची हकालपट्टी केली. कोणत्याही पक्षात जा, तुमचा पराभव अटळ आहे. कितीही देव पाण्यात घाला, राजळेंशिवाय अन्य कुणाचाही विजय होऊ शकत नाही. निवडणूक एकतर्फी होणार, असे खेडकर म्हणाले.
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला