Ahmednagar NewsMaharashtra

धनुभाऊ, बोलण्याआधी आपली पात्रता तपासा !

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

माजीमंत्री बबनराव पाचपुते भाजपसाठी पूर्वी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीका त्यांनी काल जिंतूर येथे बोलताना केली होती

मात्र आता यावरून चांगलेच वाद झाले आहेत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यानी सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहीली असून ह्यात धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे .

सोशल मिडीयावर व्हायरल झालीय हि पोस्ट …

रक्ताच्या नात्याचा विश्वासघात करुन वंदनीय मुंडे साहेबांना वेदना देणारे, बीड जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळ्यात अडकलेले श्री. धनुभाऊ मुंडे सर्वात आधी आपण आपली पात्रता तपासा.

संसदीय भाषेचा आग्रह धरणाऱ्या श्री. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही आता राजकीय वाटचाल करताय, त्यांना तुमची ही संसदीय भाषा पटेल असे, वाटत नाही.

पक्षापेक्षा स्वतःला ‘प्रमोट’ करायला निघालेले तुम्ही, आता काहीच हाती येणार नाही, म्हणून बिथरला आहात, डिप्रेशनमध्ये आहात, हेही आम्ही समजू शकतो.

तुमचं डिप्रेशन तुमच्यापाशीच ठेवा, पण आमच्या दैवताला विनाकारण बदमान करु नका, नावाचा अपभ्रंश करु नका ! राजकीय आरोप-प्रत्यारोप आम्ही समजू शकतो, पण पातळीहीन बोलू नका.

आदरणीय बबनदादांचं कर्तृत्व आणि किमान वयाचं भान न राहावं, हे आपलं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आम्ही मानतो.

तुम्ही पक्षात आहात, त्या पक्षाची विश्वासार्हता अगदी रसातळाला गेलेली आहे. त्यातच तुमचा चेहरा उपयोगी पडत नाही, म्हणून खा. डॉ. अमोल कोल्हे यांना प्रमोट केलं गेलंय.

त्यामुळं तुमची ‘मळमळ’ स्वाभाविक आहे. तुम्ही आता ज्या यात्रेतून बेछूट आणि पातळीसोडून बोलत आहात, ती यात्रा तुमची नाही, तुम्ही एक वऱ्हाडी आहात, हे लक्षात ठेवा.

आदरणीय बबनराव पाचपुते समर्थक

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button