Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

गॅस वापरता येत नाही विवाहितेचा छळ

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा येथे राहणारी विवाहित तरुणी सौ . पूजा सुनील भांगरे , वय २६ वर्ष हिला सासरी नांदत असताना

नवरा व सासरच्या लोकांनी तुझ्या माहेरुन दागिने घेवून ये , तुला कपडे धुता येत नाही ! स्वयंपाक करता येत नाही ! गॅस वापरता येत नाही

या कारणावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ करुन मारहाण केली व धमकी देवून दागिने घेवून ये , असे म्हणून माहेर पाठवून दिले.

सौ . पूजा भांगरे या तरुणीने काल राजूर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा सुनील महादू भांगरे , महादू रामचंद्र भांगरे, पद्मा महादू भांगरे, कल्पना महादू भांगरे, कविता तुकाराम घुटे , रा . मांडा , टिटवाळ , ठाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button