Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत.

आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळेल.

श्रीगोन्द्याचा आमदार ठरविण्यात विखे पाटील यांचा ही मोठा वाटा रहाणार आहे, सुजय विखे यांना लोकसभेत श्रीगोंदेतून ३० हजार मताधिक्य मिळाल्यामुळे पाचपुतेंची बाजू जमेची

असली तरी तालुक्यातील विखे समर्थक पाचपुतेंचे काम करणार का, हा प्रश्न आहेमात्र  एकंदरीत विखे हेच तालुक्याचा आमदार ठरवतील असे बोलल्यास वावगे ठरणार नाही.

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
भाजपकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे,तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार राहुल जगताप,कॉंग्रेस कडून  अनुराधा नागवडे यांना तर शिवसेनेकडून प्रा. शशिकांत गाडे, यांची नावे ह्या मतदार संघात  चर्चेत आहेत. 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती 
राहुल जगताप राष्ट्रवादी ९९,२८१ 
बबनराव पाचपुते भाजप ८५,६४४ 
शशिकांत गाडे शिवसेना २२,०५४ 
हेमंत ओगले काँग्रेस ५,११३ 

लोकसभेत कुणाची सरशी ?
भाजपचे डॉ.सुजय विखे यांना १ लाख ९,१०३ 
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप ७८ हजार ५११मते मिळाली होती 

श्रीगोंदा मतदार संघात कुकडी आणि घोड चे पाणी, तरुणाईतील वाढती बेरोजगारी, MIDC नसणे हे प्रश्न आहेत त्याच प्रमाणे तालुक्यातील काही गावांतील खराब रस्ते ही दळणवळण आणि विकासाच्या वाटचालीतील मोठे अडथळे आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button