Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

छिंदमच्या नगरसेवकपदाबाबत सुनावणी पूर्ण

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन उपमहापौर व विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या नगरसेवक पदाबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास राज्यमंत्र्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे.

यावेळी मनपासह छिंदमनेही म्हणणे सादर केले.याप्रकरणी आता नगरविकास राज्यमंत्र्याकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. सदरचा ठराव शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला असून, राज्यमंत्र्यासमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.मागील सुनावणीला छिंदमने उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र दिल्यामुळे २२ ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली.

यात छिंदमने महासभेने ठेवलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत न्यायालयात प्रकरण असून, निर्णय झालेला नसल्याचेही म्हणणे मांडण्यात आले आहे. या प्रकरणी आता नगरविकास राज्यमंत्र्याकडून निर्णय घेतला जाणार असल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button