ॲमेझॉन किराणा माल विकणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतीय बाजारात पाय पसरण्यासाठी, विस्तारासाठी विविध प्रयोग करत आहे. आता त्यांनी रिटेल संबंधित धोरणांनुसार किराणा बाजारात पाय ठेवण्यासाठी तयारी चालवली असून त्यांनी किराणा मालाच्या लाखो दुकानांना आपल्या बरोबर संलग्न करण्याची तयारी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या स्तरावर यासाठी योजना असून किराणा स्टोअर्सशी ते समझोता करणार आहेत, त्यामुळे या मंचाद्वारे किराणा स्टोअर्सचे व्यापारी आपले सामान विक्री करतील. बहुमुखी अशी न्यू कॉमर्सची ही ॲमेझॉनची योजना आहे.

या संकल्पनेशी संबंधित एका जाणकार सूत्राने सांगितले की, फोन विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना आपल्या मंचावर नोंदणीकृत करील व त्यानंतर ॲपद्वारे अन्य विके्रत्यांना जोडून खाण्याच्या वस्तूंपासून ते सामान्य गृहोपयोगी वस्तूंचीही विक्री करतील.

ॲमेझॉनने बंगळुरूच्या स्टार्टअप कंपनी शॉपएक्सशी समझोता केला आहे. शॉपएक्स ही कंपनी किराणा दुकानांना मोठ्या रिटेलर्स व एफएमसीजी कंपन्यांशी डिजिटल पद्धतीने संलग्न करते. येथील एकंदर आर्थिक पद्धतीचा विचार करून तेथे सतत संशोधन करीत आहोत. सध्या तरी आम्हाला कोणतीही नवीन घोषणा करायची नाही, असेच ॲमेझॉनचे म्हणणे आहे.

उत्पादन विकण्यासाठी गल्लीतील एका छोट्या दुकानाला जोडणारी ॲमेझॉन काही पहिलीच कंपनी नाही. अशा छोट्या दुकानदारांना भागीदारीमध्ये घेऊन कंपनीच्या ॲपद्वारे मोबाईल फोन विकण्याचीही संधी यापूर्वी अन्य एका ई-कॉमर्स कंपनीने दिली होती.

ई-कॉमर्सचा हा भारतात होत असणारा विस्तार असून याच पद्धतीने ऑनलाईन कंपन्या दूरवरच्या भागातही डिलिव्हरी एजंटद्वारे वा अशा प्रकारच्या किराणा दुकानांचा वापर करून पोहोचत आहेत. भारतात वार्षिक स्तरावर ६५० अब्ज डॉलरचा रिटेल बाजार असून त्यामध्ये ई-कॉमर्स व आधुनिक व्यापारी यांची हिस्सेदारी केवळ १० टक्के आहे.

उर्वरित ९० टक्के हिस्सेदारी छोट्या छोट्या दुकानदार, व्यावसायिकांची आहे. याकडेच ई-कॉमर्सच्या या बड्या कंपन्यांचे लक्ष आहे. छोट्या दुकानदारांशी समझोता करत त्यांना डिजिटलायझेशनमध्ये व त्या डिजिटल व्यवहारात आणत आहेत व त्यांचे नुकसान नव्हे तर त्यांची मदत या काळात आम्ही करत आहोत, असा संदेश देण्याचेच सध्या तरी या बड्या कंपन्यांचे काम चालले आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Comment