Ahmednagar NorthBreaking

दुष्काळामुळे उभी पिके संकटात

नेवासा – दुष्काळ हटलाच नसल्याने कुकाणा परिसरातील उभी पिके पाऊस व पाटपाण्याअभावी संकटात सापडली असून, खरिपाची पिके या आठवड्यात माना टाकू लागली आहेत.

पाटबंधारे विभागाने पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभ्या शेतपिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरू असलेले आवर्तन गांभिर्याने घ्यावे, असे आवाहन कुकाण्यातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग यांनी केले आहे.

कुकाण्यासह परिसरातील देवगाव, देडगाव, तेलकुडगाव, जेऊरहैबती,तरवडी, वडुले, वाकडी, शिरसगाव, चिलेखनवाडी, आंतरवाली, देवसडे, पाथरवाला, सुलतानपूर, सुकळी, नांदूर शिकारीसह लगतच्या शिवारातील पिके पाटपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांना या दोन-तीन दिवसात पाटपाणी न मिळाल्यास उभी पिके जळण्याची शक्यता आहे. विहिरींना पाणी वाढेल, असा एकही दमदार पाऊस कुकाणा परिसरात अजून झालेला नाही.पिकांचा भरवसा पाटपाण्यावरच आहे

मात्र, आता पाटपाण्याचे नियोजनच महत्वाचे आहे. पाऊसही नाही आणि पाटपाणीही नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कापूस, बाजरी, मका पिके जोमात आहेत. परंतु या पिकांना त्वरित पाण्याची गरज आहे.

कुकाणा परिसरात अजूनही दुष्काळीच परिस्थिती आहे. मुळा धरण भरले असले तरी पिकांना लगेचच पाटपाणी मिळेल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे उभी पिके हातातून जातात की काय याच चिंतेत शेतकरी आहेत, असेही श्री. अभंग यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button