जामखेड : महाजनादेश यात्रेत सोमवारी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत जामखेडकरांना दिलासा दिला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे.
समुद्रात वाहून जाणारे सुमारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून नाशिक, नगर व मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.

जलसंधारणमंत्री म्हणून पंकजा मुंडे व राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगले काम केल्याचे फडणवीस म्हणाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, काँग्रेसने ध्रुवीकरणाचे, तर राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले.
गेल्या ७० वर्षांत जी कामे प्रलंबित होती, ती करताना समाजातील सर्व घटकांना भाजपने बरोबर घेतले. मराठा आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावतानाच धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करून न्याय देण्याची भूमिका घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
कुकडी प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला देण्याची मागणी त्यांनी केली. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा धरणात कुकडीचे पाणी नियमित सोडण्यात यावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री मी आताच निवडला आहे. राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार आहे. जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं त्यांना मिळेल.
- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यात भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर, ६३ पदाधिकाऱ्यांचा समावेश
- भंडारदरा येथील रंधा धबधब्याच्या पाण्यात उडी घेत तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी, कृती टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन
- वांबोरी चारी टप्पा एकच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १४ कोटींचा निधी मंजूर, ४३ गावातील शेतकऱ्यांना होणार फायदा
- भंडारदरा येथील रंधा धबधब्याच्या पाण्यात उडी घेत तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी, कृती टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन
- Pune-Nashik Expressway : पुणे ते नाशिक फक्त ३ तासांत! सरकारचा २८,००० कोटींचा धडाकेबाज महामार्ग प्रकल्प