Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने बेवारस तरूणीचे कौटुबिक पुनर्वसन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश राज्यातील धामणी कटोरा (ता. रानापूर, जि. झाबुआ) येथील एका आदिवासी समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील तरूणी सुमित्रा रालू अटल भुरिया (अंदाजित वय 26 वर्ष) मानसिक भान हरवून रस्तावरच जीवन जगत होती. कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे तीला कोणतेही उपचार घेता आले नाही.

व सभोवतालचे वातावरण पोषक नसल्याने ऑक्टोबर 2018 ला रस्त्याने फिरत फिरत ती एका ट्रकमधे बसून पुणे शहरात पोहचली. पुणे येथील स्नेहाधार या संस्थेने सदर तरूणी मनोरूग्ण असल्यामुळे अहमदनगर येथे बेवारस मनोरूग्णांच्या पुनर्वसनाकरीता कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाशी संपर्क साधून दि.14 फेब्रुवारी रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. 

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ ही संस्था रस्त्यावरील बेवारस मनोरूग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी कार्य करते. मानवसेवा प्रकल्पात सुमित्रा या तरूणीला अन्न, वस्त्र, निवारा यासह मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार देण्यात आले. सुमित्रा ही मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी भागातील असल्यामुळे ती आदिवासी भाषा बोलायची. ही भाषा समजायला संस्थेतील कार्यकर्त्यांना अडचण निर्माण होत होती.

उपचार व सपुदेशनानंतर ही तरूणीने आपल्या गावचे नाव सांगितले. संस्थेतील कार्यकर्त्यांनी थेट मध्यप्रदेशातील रानापूर पोलिस स्टेशनची मदत घेत सुमित्राचे कुटुंब शोधण्यात दि. 21 ऑगस्ट रोजी यश मिळवले. सुमित्रा या तरूणीला भ्रमणध्वनीवरून कुटुंबाशी संवाद साधण्यात आला. यावेळी वातावरण पुर्ण भावनिक बनले होते. नुकतेच काही दिवसापुर्वी सुमित्राच्या काकुचा मृत्य झाला होता.

दि. 23 ऑगस्ट ला या तरूणीच्या कौटुंबिक पुनर्वसनाकरीता सामाजिक कार्यकर्त्यांची टीम संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्यासह सिरीज शेख, प्रतिभा तळेकर, डॉ. संदेश बांगर, सागर विटकर मध्यप्रदेशाकडे रवाना झाले. सुमित्राला प्रकल्पातून निरोप देण्यासाठी अहमदनगर तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरिक्षक श्रीमती पांढरे यांनी तीला साडीचोळी नेसून पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. राजेद्र पवार हे उपस्थित होते.

 अमृतवाहिनीची टीम सुमित्राला घेवून दि.24 ऑगस्ट रोजी रानापूर (मध्यप्रदेश) ला पोहचताच या तरूणीचे आई वडील व सर्व नातेवाईक गोळा झाले. सुमित्रा भेटताच सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तब्बल एक वर्षांनी आमची मुलगी आम्हाला परत मिळाली देव देवळात नाही तर मानसात असल्याची प्रतिक्रीया तीचे वडील रालू अटल भुरीया यांनी दिली.

रानापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्या समक्ष सुमित्राला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. सुमित्राला पुढील काही महीण्यांचे औषधे सोबत देण्यात आले. भारतातील बेवारस मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेच्या कार्याचे रानापूर जि. झाबुआ (मध्यप्रदेश) येथील पोलिस निरिक्षक कैलास चौहान यांनी कौतुक केले व या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. याकार्यासाठी डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. संदेश बांगर, सिराज शेख, प्रतिभा तळेकर, अंबादास गुंजाळ, सागर विटकर, राजू पाटाळे, शैला तुपे, मच्छिंद्र दुधवडे, विकास बर्डे, अशोक मदणे, कैलास शिरसाठ यांनी परिश्रम घेतले आणि अविनाश मुंडके, बालाजी तनपुरे, शशिकांत चेंगेडे, संजय शिंगवी, प्रदीप पेंढारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button