बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महीला जागीच ठार

Published on -

पारनेर ;- प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली.

पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.

राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील राधाबाई कारभारी वाजे या आज पहाटे ५.३० वाजता घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रत:विधीसाठी गेल्या होत्या.

त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून घरापासून दूर ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात राधाबाई यांचे मुंडके व एक तळ पाय शरीरापासून दूर झाला असून त्यातच त्यांचा करून अंत झाला.

या घटनेची माहीती समजताच पोलिस प्रशासन व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.

पारनेर तालुक्यातील वडनेर, वाजेवाडी शिरापुर परीसरात गेल्या दोन तीन महिन्यापासुन बिबट्याचा वावर होता.तसेच या परीसरात अनेक जनावरांना या बिबट्याने भक्ष केले होते. या बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!