श्रीगणेशाची घरात प्रतिष्ठापना करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची दक्षता घेतलीच पाहिजे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री गणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते.

 उद्या सोमवार 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील. गुरुवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. भव्यदिव्य गजरात गणेशाचे स्वागत केले जाईल. परंतु अनेक जणांचे श्रीगणेश मूर्तीच्या सोंडसंदर्भात वेगवेगळे मतभेद आहेत. 

अनेक लोकांना माहिती नसावी. घरातील श्रीगणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या बाजूला.आज त्याबद्दल ही माहिती उपयुक्त ठरेल 

1]  घरामध्ये नेहमी डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन करावी. घराच्या मुख्य दरवाजावर गणेश मूर्ती लावायची असल्यास त्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी.

2]  डाव्या सोंडेचा गणपती घरात असल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते. अशाप्रकारच्या गणेश मूर्तीमुळे घरातील वातावरण संतुलित राहते.

3]  घरमाध्य मध्य भागाला ब्रह्म स्थान म्हणतात. या जागेचे कारक तत्त्व पृथ्वी आहे. घरामध्ये स्थापित गणेश मूर्ती पिवळ्या मातीची असल्यास हे अत्यंत शुभ राहते. घरामध्ये अशाप्रकारची डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन केल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात.

Leave a Comment