श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला.

सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज त्यांनी थोरात यांची साथ सोडली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप तसेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत चालली असून आमदार कांबळे यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील आणखी एक काँग्रेस आमदार सत्ताधार्यांच्या गळाला लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील हे भाजपात गेले. व खासदार झाले.
त्यांनतर ना. विखे पाटील यांनीही काँग्रेस ला रामराम करत भाजपाचा रस्ता धरला. तेव्हापासून काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात गळती लागली आहे.
माजीमंत्री वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशा नंतर आता आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे आ.भाऊसाहेब कांबळे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान या वृत्ताबाबत आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला असून मी मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी
- सोन्याच्या किमतीत 2 जुलै रोजी मोठा बदल ! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशास वेग! दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
- आनंदाची बातमी : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ‘या’ भत्यात मोठी वाढ ! वाचा सविस्तर
- अहिल्यानगरमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मांडला ठिय्या