Ahmednagar NorthBreaking

नेवाशाला उद्योगनगरी बनवणार – आ. मुरकुटें

नेवासा :यापूर्वी नेवासा तालुक्यातील विकास फक्त कागदावरच दाखवला जायचा. निधी आणल्याच्या वल्गना व्हायच्या; परंतु प्रत्यक्षात काम दिसायचे नाही. ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करुनच आपण २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्या दिवसापासून आमदारकीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा, वाड्या- वस्त्यांचा सखोल अभ्यास करून तेथील गरजा लक्षात घेतल्या. आपण आमदार होण्यापूर्वी तालुक्यातील ७५ टक्के रस्त्यांची दुरवस्था होती. आमदार झाल्यावर शासनाकडून रस्त्यांसाठी भरीव निधी मिळवला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सर्वाधिक निधी खेचून आणत बहुतांश गावे, वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात यश आले आहे. वीजेचा प्रश्नही याच पद्धतीने सोडवला. सरकारकडून निधी मिळवत नवीन वीज उपकेंद्र, रोहित्रांचे काम मार्गी लावले.

शेतीच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. २०१४ मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यावर लगेचच जलयुक्त शिवारसारखी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. या योजनेतून नेवासा तालुक्यात अनेक कामे हाती घेतली. बंद पडलेल्या पाणीयोजना कार्यान्वीत केल्या.

शेतीला हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केला. याच काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रूग्णांना ६ कोटींहून अधिक रुपयांची मदत मिळवून दिली. नेवासा शहराला नगरपंचायत झाल्यावर येथील विकासकामांसाठी राज्य सरकारकडून तब्बल ७० कोटींचा निधी आणण्यात यश आले आहे. त्यामुळे येत्या काळात नेवासा शहराचा कायापालट झाल्याचे निश्चित पहायला मिळेल, असा विश्वास आ. मुरकुटे यांनी व्यक्त केला

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button