श्रीगोंदे मतदारसंघासाठी १८ कोटींंचा निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदे : श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत जल संधारणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील काही कामांचा कार्यारंभ आदेश झाला आहे, तर काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली.

मतदारसंघातील ११ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ८७ लाख एवढा निधी मंजूर होऊन त्यांचा कार्यारंभ आदेश झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये श्रीगोंदे हाडोळा – ४३.६८ लाख, हिरडेवाडी – ४३.६५, वाण्याचा मळा – ४५.२८, भोळेवस्ती- ४०.०२, औटवस्ती – १५.७२, राऊत मळा – ४०.६६, श्रीगोंदे आंबील ओढा – ६२.१०, हंगेवाडी (कोळपेवाडी) – ७६.६७, हंगेवाडी (संगमवाडी)- ९०.००, गव्हाणेवाडी (सोलनकर वस्ती) – ९६.१२, महादेववाडी (गायकवाड वस्ती) – ३३.२४ यांचा समावेश आहे.

नवीन १९ बंधाऱ्यांना शासकीय मंजुरी मिळाली असून या सर्व कामांसाठी ११ कोटी ८१ लाख ५१ हजार २०६ एवढा निधी मंजूर करण्यात आला. या कामांमुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे, अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

परिसरातील या कामांमुळे जास्तीत जास्त पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. श्रीगोंदे तालुक्यातील जास्तीत जास्त कामे ही पूर्व भागात असून येथे या कामांची गरज होती. या भागात पाऊस कमी पडतो, त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी साठवून ठेवल्यास उन्हाळ्यात पाणी मिळेल. जमिनीत पाणी मुरून पाणीपातळीही वाढणार आहे.

तसेच नव्याने प्रशासकीय मान्यता मिळालेल्या साठवण बंधाऱ्यांची कामे घुगलवडगाव (चव्हाण मळा) ६६.८६ लाख, घुगलवडगाव (दांगडे मळा) ६५ लाख, घुगलवडगाव (माउली डोह) ५७.६९ लाख, घोडेगाव (खंडोबा) ८६.६१ लाख, घोडेगाव (तरवडी) ८६.६२ लाख, घोडेगाव (वाडगा) ८४.६५ लाख, शेडगाव (रणसिंग मळा) ३६.९४ लाख,

शेडगाव (बोबडे वस्ती) ४५.२० लाख, टाकळी कडेवळीत (इथापे मळा) ४७.७६ लाख, टाकळी कडेवळीत (खामकर वस्ती) ४८.०५ लाख, आढळगाव ७२.१७ लाख, हिरडगाव (दानगुडे मळा) ३९.४५ लाख, श्रीगोंदे (रायकर मळा) ७९.०३ लाख आदींचा समावेश आहे.

Leave a Comment