आधार लिंक केले असेल तरच दारू भेटणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल सतत येत असलेल्या तक्रारीनंतर आता उत्पादन शुल्क विभागाने ही समस्या सोडवण्यासाठी अनोेखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार दारूची बाटली खरेदी करण्यापूर्वी आधारकार्ड जोडावे लागणार आहे.

त्यामुळे बेजबाबदारपणे कुठेही रिकामी बाटली फेकणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करता येईल. कागदावर ही योजना चांगली वाटत असली तरी, त्यामुळे चोरून पिणाऱ्यांची चांगलीच अडचण निर्माण होणार असून काळाबाजार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. यातून सुटका मिळवण्यासाठीच्या मंगळुरू येथील राष्ट्रीय परिषद समरक्षण ओकोटाने उत्पादन शुल्क विभागाकडे एक योजना सादर केली आहे.

योजनेचा स्वीकार करत उत्पादन शुल्क विभागाने ओकोटाला विभागीय स्तरावर चर्चा केल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

याबाबत मद्याच्या बाटलीला आधारशी जोडण्यासाठी योग्य सल्ला द्यावा, असे उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांसह आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय अमलात आल्यास फेकलेल्या वा फुटलेल्या बाटलीवरील बारकोड स्कॅन करून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जाईल.

ग्राहकाची ओळख पटल्यानंतर त्यास कठोर दंड ठोठावण्यात येईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सर्व दुकानदार दारूच्या विक्रीची यादी ठेवतील. यात प्रत्येक ग्राहकाचा आधार अथवा मोबाईल नंबर नोंद करण्यात येईल. याद्वारे बारकोड स्कॅन केल्याने बॅच नंबर आणि पॉंइट ऑफ सेलची माहिती काढण्यात मदत मिळेल.

उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे आणि निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल. यात नवीन बाटली खरेदीसाठी ग्राहकांना रिकामी बाटली परत करण्याची सक्ती केली जाऊ शकते.

Leave a Comment