चक्क कॉफीपासून बनविले सनग्लासेस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लंडन : कॉफी पिण्याच्या कामी येते आणि सनग्लासेस म्हणजे चष्मा उन्हापासून बचाव करण्यासाठी. डोकेदुखी कमी करण्यासाठी दोन्हींची मदत होते. असे असले तरी कॉफी व सनग्लासेस यांच्यात एखादा फार जवळचा संबंध नाही.

मात्र लवकरच दोन्हीमध्ये एक नाते तयार होणार आहे. कारण आता कॉफीचा सनग्लासेस बनविण्यासाठी वापर केला जात आहे. युक्रेनमधील ओचिस आयवेयर ब्रँडने एक संशोधन करत कॉफीपासून बनविलेले सनग्लासेस बाजारात आणले आहेत.

त्यांची खासियत म्हणजे ते परिधान करताच कॉफीचा सुगंध येऊ लागतो. ओचिस कॉफीचे मक्सीम हवलेको यांच्या माहितीनुसार, इको फ्रेंडली व फॅशनेबल सनग्लासेस बनविण्याच्या प्रयत्नात त्यांनी मिंट, पार्सले व कार्डमोम यांच्यावर प्रयोग केल्यानंतर कॉफीपासून सनग्लासेस बनविण्यात यश मिळविले. हरित उद्योगात कॉफीच्या वाया जाणाऱ्या भागांचा फर्निचर बनविण्यासाठी वापर केला जातो.

कॉफीच्या अशाच कचऱ्यापासून आता सनग्लासेस बनविण्यात आले आहेत. सनग्लासेस व कॉफी दोन्हींचा रंग काळा असतो, दुसरे म्हणजे जगात कॉफीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

हवलेंको मागील १५ वर्षांपासून चष्मा बनविणे व विक्रीच्या व्यवसायात आहेत. कॉफीपासून सनग्लासेस बनविण्यात यश मिळविण्याआधी त्यांना ३०० नमुने रद्द करावे लागले. मात्र आता याच कॉफीपासून बनलेले सनग्लासेस ८० डॉलर म्हणजे सुमारे ५,६०० रुपयांना ऑनलाइन उपलब्ध आहेत.

Leave a Comment