लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे.
राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच ज्या भागात अशा प्लास्टिक पिशव्या सापडतील अशा पोलीस ठाण्याचे प्रमुख, नागरी अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी, दंडाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटलेले होते.
यानंतर रविवार (१ सप्टेंबर)पासून ही बंदी लागू करण्यात आलेली असून, बंदी असतानाही कुणी वापर करत असल्यास याची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपली नावे गुपीत ठेवली जातील. यासाठी लखनौ पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!