पैसे मागितल्याने टपरी चालकाचा खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : बाणेर परिसरातील पानटपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघांनी कोयता व गुप्तीने वार करून एकाचा खून केला. ही घटना बाणेरमधील डी मार्टजवळ रविवारी (दि.१) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

संतोष नरहरी कदम (वय ३२, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे मृत टपरीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रामप्रभु मोटे (वय ३९, रा. मुळशी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ कल्याण चतुर (वय २१), अभिषेक लाला कोर्डे (वय २१, दोघेही रा. मुळशी) यांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे करण नावाचे हॉटेल आहे.

हॉटेलजवळ त्यांचा भाचा संतोष कदम याची बाणेरमधील डी मार्टजवळ पानटपरी आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिघेजण संतोषच्या टपरीवर आले. तसेच, त्यांनी संतोषला सिगारेट मागितली. त्याप्रमाणे त्यांनी सिगारेट देवून त्यांच्याकडे पैसे मागितले.

यावरून तिघांपैकी एकाने ‘तू आमच्याकडे पैसे मागतो, तुला माहीत नाही का, आम्ही या भागातील भाई आहोत’ असे बोलून संतोष याच्या तोंडावर चापट मारली. या वेळी फिर्यादीने मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडविले.

मात्र, त्या तिघांनी तेथून जात असताना आम्ही तुला बघून घेऊ, तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.या घटनेनंतर सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ब्लॅक्या नावाच्या व्यक्तीने त्याच्या साथीदाराकडून गुप्ती घेऊन संतोष कदम याच्या पोटात भोसकली.

Leave a Comment