नगर : रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणी वाजवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका मंडळाविरूध्द गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
संजयनगर येथील गणेश मित्र मंडळाच्या गणपती मंडपासमोर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवाना स्पिकर लावून कर्णकर्कश्य आवाजात गाणी लावली.

याप्रकरणी कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या फिर्यादीवरून देविदास तुकाराम वैराळ (भूषणनगर, केडगाव) व संदीप अरुण सूर्यवंशी (काटवन खंडोबा) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नेवासा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरावरील ऊस जळून खाक, आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान
- राहुरी तालुक्यात मोटारसायकलवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले, दोघांवर गुन्हा दाखल
- कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान
- सततच्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा परिसरातील भात पिकांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
- ग्रोे मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीने लोकांना घातला ३५० कोटींचा गंडा, कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची मा.खा डॉ. सुजय विखेंची माहिती