Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

दामदुप्पटीच्या आमिषाने २९६ लोकांना गंडा

संगमनेर : संगमनेरात सुरुअसलेल्या फिनॉमिनल हेल्थ केअर स्व्हिहसेस कंपनीने २९६ लोकांना दामदुप्पटीचे आमीष दाखवून ८१ लाख २९ हजार ३८७ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना दि. २८ फेब्रुवारी २००९ ते जून २०१६ या दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी सातजणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर याठिकाणी फिनॉमिनल हेल्थ केअर स्व्हिहसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीचे संगमनेरमध्ये कार्यालय होते.

यामध्ये मेडीक्लेम सुविधा मिळतील व नऊ वर्षानंतर भरलेल्या पैशाचा दामदुप्पट स्वरुपात परतावा मिळेल, म्हणून नंदलाल केशरसिंग (अध्यक्ष, रा. सुहास टेरेसमागे, पन्नालाल घोष मार्ग, लिंकरोड, भंडारवाडा, मालाड (पश्चिम) मुंबई),

जोसेफ लाझार (कार्यकारी संचालक, रा.सी.टी.एस. नं. ३५९ – सी सुहास टेरेस मागे, पन्नालाल घोष मार्ग, लिंकरोड, भंडारवाडा, मालाड (पश्चिम) मुंबई), नितीन रावसाहेब हासे (झोनल मार्केटींग मॅनेजर, रा. चिखली, ता. संगमनेर), बापू प्रभाकर माने (झोनल मॅनेजर, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्ये (सेल्स मॅनेजर, रा. गारपीरमळा, चिखली, ता.संगमनेर),

नितीन बाळासाहेब पोखरकर (सेल्स मॅनेजर, ता.जुन्नर, जि. पुणे), रामनाथ रंगनाथ गोडगे (ज्युनिअर सेल्समन, रा.अकोलेरोड, चिखली, ता. संगमनेर) या सर्वांनी सुभाष कचरु भुजबळ (रा. पारेगाव रोड, गोविंदनगर, येवला, ता.येवला, जि.नाशिक) व साक्षीदार यांना आमीष दाखवले व त्यांना पैसे गुंतवण्यास सांगितले.त्यामुळे तालुका येवला व संगमनेर येथील वाघ हाऊस नवीन नगर रोड,

संगमनेर याठिकाणी वेळोवेळी पैसे स्वीकारुन त्याच्या पावत्या दिल्या. त्यानंतर भुजबळ व साक्षीदार यांनी भरलेल्या रकमेवर सदर पॉलिसीची मॅच्युरिटीची दामदुप्पट परतावा न देता, कार्यालय बंद केले. त्यानंतर भुजबळ व साक्षीदार यांचे भरलेले पैसे व त्याचा मोबदला कंपनीने परत दिला नाही. त्यामुळे भुजबळ व साक्षीदार यांची एकूण ८१ लाख २९ हजार ३८७ रकमेचा अपहार करुन फसवणूक केली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button