बीजिंग : भारतामध्ये सध्या डिजिटल पेमेंटवर जास्त जोर दिला जात आहे. त्यासाठी स्मार्टफोनचा वापरही वाढत आहे. पेटीएम, फोनपे, गुगलपे, मोवी क्विकसारखे अनेक स्मार्टफोन ॲप डिजिटल पेमेंटसाठी उपलब्ध आहेत.
मात्र चीनने याबाबतीत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. तिथे रोख रक्कम वा कार्ड पेमेंट सोडाच, स्मार्टफोन आणि डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करण्याची पद्धतही जुनी ठरू लागली आहे. फेशियल पेमेंट स्व्हिहस ते त्यामागचे कारण आहे.

चीनमध्ये लोक वस्तू खरेदी करतात आणि आपल्या चेहऱ्यामार्फत पैशांचा भरणा करतात. चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे फायनान्सशियल आर्म अली-पे या पेमेंट सेवेमध्ये अग्रेसर आहे. चीनच्या सुमारे शंभर शहरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
अली-पे हे तंत्रज्ञाना लागू करण्यासाठी पुढील तीन वर्षांत सुमारे ४२ कोटी डॉलर खर्च करणार आहे. खरेदीनंतर लोक कॅमेऱ्यासोबत जोडलेल्या पीओएस मशीनसमोर उभे राहतात व पेमेंट करतात. त्यासाठी त्यांना पहिल्यांदा आपला चेहरा बँक खाते वा डिजिटल पेमेंटसोबत लिंक करावा लागतो.
चीनमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी ही सेवा सुरू झाली व आता तिचा विस्तार शंभर शहरांमध्ये झाला आहे. फेशियल रेकॉग्शिन सॉफ्टवेयरचा पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. लोकांवर नजर ठेवण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्याची मोठी मदत होते. आता त्याचा पेमेंट प्रक्रिया सुलभ बनविण्याासठी वापर केला जाऊ लागला आहे.
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 3 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट ; महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत?
- चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!
- अहिल्यानगर न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या ५० सदनिकेसाठी तब्बल ६४ कोटींची मंजूर, आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले