अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीत योगेश राजू पवार (रा. बोल्हेगाव, नगर) हा जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश वाकळे याने मित्र योगेश पवार यास बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅकवर बोलून घेतले. यावेळी वाकळे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पवार यांनी १३० रुपये दिले. मात्र त्यांनी आणखी पैसे मागितले.
पवार याने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या वाकळे व कोलते या दोघांनी पवार यास मारहाण करण्यास सुरुवात केली. कमरेचा पट्ट्याने पाठीत मारून हातातून सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली
- FD विसरा! मिडल क्लास लोकांसाठी ‘या’ आहेत जास्त परतावा देणाऱ्या 10 योजना, जाणून घ्या अधिक
- दर मिनिटाला धावते ट्रेन, भारतातील सर्वात मोठं आणि वर्दळीचे स्टेशन कोणते?, तब्बल 150 वर्षांहून जुने आहे हे स्टेशन!
- घरातील ‘या’ दिशेला असतो शनिदेवाचा वास, इथे चुकूनही 3 कामे करू नका; अन्यथा संकट निश्चित!
- धरण बांधण्यासाठी स्वतःची दागिने विकली, हजारो घरातला अंधार दूर करणारा हा महान राजा कोण? वाचा!
- CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 280 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा