Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

पारनेर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका !

पारनेर :- तालुक्यातील वाळू तस्करांना पारनेर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील शिरसुले, शिक्री व कान्हूर पठार या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून सुमारे ६० लाख २८ हजार ६००रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

तर अवैध वाळू तस्करी प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील नदीसह अनेक ओढ्या नाल्यातून देखील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत आहेत.

बेसुमार वाळूउपशामुळे या भागातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे.या वाळूतस्करांना अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घालण्याचे देखील प्रकार तालुक्यात घडले आहेत.

त्यामुळे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार दि.८रोजी पोना.गुजर हे तालुक्यातील कान्हूर पठार येथे नोटीस बजावण्याचे काम करत होते.

यावेळी पांढऱ्या रंगाचा डंपर विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळून आला.या प्रकरणी किरण दत्तात्रय वाळूंज (वय २३ रा.वासुंदे,चालक), अशोक रामदास खराबी (रा.टाकळी ढोकेश्वर, मालक) या दोघांविरोधात पोना.गुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोहेकॉ.शेख हे करत आहेत.

तालुक्यातील शिक्री येथे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ८ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यात दोन ट्रॅक्टर व २ ब्रास वाळू आहे. शिक्री येथे अविनाश किसन शिंदे मारूती लहानू शिंदे (दोघेही रा.शिंदेवाडी आने ता.जुन्नर) हे दोघेजन शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अवैधपणे वाळू वाहतूक करताना आढळून आले.

याप्रकरणी पारनेर पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व २ ब्रास वाळू असा एकूण ८ लाख १२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जपत केला आहे. याप्रकरणी पोकॉ.अजिंक्य दिलीप साठे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील शिरसुले येथे अवैध वाळूतस्करांवर छापा टाकून तीन ट्रॅक्टर व वाळू असा एकूण ३७ लाख ६०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना तालुक्यातील शिरसुले परिसरातील ओढ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी करत असल्याची गुप्त बातमीदराने माहिती दिली.

त्यानुसार त्यांनी संबंधित ठिकाणी पथक पाठवले असता, त्याठिकाणी पिवळ्या रंगाचा एक जेसीबी (एमएच १२ क्युटी ३२१६), दोन निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (एमएच १६ बीवाय ६९८८), दुसऱ्या ट्रॅक्टरचा नंबर खोडलेला आढळून आला.

पोलिसांनी जेसीबी चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने प्रवीण बाळासाहेब लंके (वय ३० वर्षे रा.निघोज) असे सांगितले.या गडगडीत इतर दोन टॅक्टर चालक मात्र अंधाराचा फायदा घेवून ट्रॅक्टरसह पळून गेले. याप्रकरणी प्रवीण बाळासाहेब लंके व इतर अज्ञात चालक असे एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button