अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुणतांबा चौफुली ते इगडेफाटा दरम्यान गुरसळ वस्ती, डाऊच खुर्द (ता. कोपरगाव) येथे शनिवारी (दि. ७) रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी, रवींद्र सर्जेराव जानराव (वय ४२, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) हे दुचाकी (क्र. एमएच १५, बीएस ८३८०) वरून जात असताना अज्ञात वाहनाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस धडक दिली. 

यात रवींद्र जानराव हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक अपघाताची खबर न देता निघून गेला. 

याप्रकरणी जनार्धन तुळशीराम जानराव (वय ३८, रा. अंदरसूल, ता. येवला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment