श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे.
यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केलेले भाऊसाहेब कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.
याद्वारे सूचक शब्दात त्यांच्यावर टीका केली जात आहे. कांबळेच्या विरोधात श्रीरामपूर शहरासह आसपासच्या भागात रात्रीतून अज्ञात व्यक्तींनी फलक लावले. या फलकांवर ‘आमचं ठरलंय, सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं’ असा मजकूर आहे.
त्यामुळे कांबळेंविरोधात आता जाहीर स्वरुपात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याआधीही त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्यावर स्थानिक स्तरावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता. पण तो आता थंडावल्यानंतर अचानक बॅनरबाजीतून कांबळेंवर टीका सुरू झाल्याने श्रीरामपूर शहर व परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
- पुढील २५ वर्ष तुमच्या मुला-बाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही- माजी खासदार सुजय विखेंची शेतकऱ्यांना ग्वाही
- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण
- Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?
- ज्या तत्परतेने नागरिकांचे अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही? आमदार हेमंत ओगलेंनी सभागृहात सरकारला धरले धारेवर
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय,महाराष्ट्र बँकेचे होणारे स्थलांतर अखेर थांबले, गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंद साजरा