मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला.

शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

अकोले येथे सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी महाजनादेश यात्रा आली होती.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाई फेकली.

यापूर्वीही या महिलेने जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. या महिलेनेच पुन्हा अकोले येथे मुख्यमंत्र्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात बेरोजगार तरुणांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.

नागरिकांच्या उपयोगाचे महापोर्टल बंद करण्यात आले. तसेच अकोले तालुक्यातून वैभव पिचड यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Leave a Comment