लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वृत्तसंस्था ;- चांद्रयान-२ मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्याच्या घटनांची इस्त्रो अगदी बारकाईने माहिती घेत आहे. इस्त्रोने विक्रमशी संपर्क तुटला त्याच रात्री चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत इस्त्रोच्या नियंत्रणाखाली लॅण्डर होते.

शनिवारी पहाटे १.४० ला लॅण्डरने ठरवून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने वेग कमी करत प्रवास सुरू ठेवला. चांद्रभूमीवर उतरण्यासाठी लॅण्डरने योग्य ती दिशाही पकडली. दक्षिण गोलार्धाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असताना १.५० ला इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात शांतता पसरली. त्याचवेळेस काही तरी गोंधळ झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर तब्बल २० मिनिटे इस्त्रोकडून काहीच माहिती दिली जात नव्हती. २.१८ मिनिटांनी इस्त्रो प्रमुख सिवान यांनी विक्रमचा प्रवास २.१ किलोमीटरपर्यंत योग्य दिशेने सुरू होता. त्यानंतर लॅण्डरकडून पृथ्वीशी होत असलेला संपर्क तुटला.

आतापर्यंतच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. यानुसार, पाच किलोमीटर ते तीन किलोमीटरच्या दरम्यान लॅण्डरच्या मार्गात बदल झाला. २.१ किलोमीटरपर्यंत लॅण्डर इस्त्रोच्या नियंत्रणाखाली होते. त्यानंतर ४०० मीटरवर असताना लॅण्डर आणि पृथ्वी यांच्यातला संपर्क तुटला.

लॅण्डर रडारावरून बेपत्ता झाले. प्रस्तावित जागेपासून अध्र्या किलोमीटर अलीकडे लॅण्डर उतरले. चांद्रभूमीपासून जवळच्या अंतरावरून ते कोसळल्याने त्याची हानी झाली नाही. दरम्यान, इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस असून लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे.

Leave a Comment