पेटीएमला सहन करावा लागला इतक्या कोटींचा तोटा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला.

या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ३९५९.६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.

कंपनीने ही आकडेवारी आपल्या शेअर होल्डर्सनाही दिली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीचे उत्पन्न ३३१९ कोटी रुपये होते व त्यापूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१७-१८ मध्ये ते ३२२९ कोटी रुपये इतके होते.

कन्सॉलिडेटेड महसूल ४२१७ कोटी रुपये होता. यामध्ये पेटीएम मनी फॉर म्युच्युअल फंड इनव्हेस्टमेंट, पेटीएम फायनान्शियल स्व्हिहसेस, पेटीएम एंटरटेन्मेंट स्व्हिहसेस व अन्य उप कंपन्याही समाविष्ट आहेत.

Leave a Comment