IndiaLifestyle

आयफोन झाला २७ हजारांनी स्वस्त !

नवी दिल्ली : जगविख्यात स्मार्टफोन उत्पादक ॲपल कंपनीने बहुप्रतीक्षित आयफोन ११ सीरिजमधील आयफोन ११, आयफोन११प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे तीन फोन मंगळवारी सादर केले.

नवीन आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यांच्या जुन्या आयफोनच्या किमतीत कपात करत असते. त्यानुसार गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन एक्सआरची किंमत तब्बल २७ हजारांनी घटवण्यात आली आहे.

आयफोन११ सीरिज लाँच होईपर्यंत ॲपलच्या संकेतस्थळावर आयफोन एक्सआर (बेसिक व्हेरिअंट) फोनची किंमत ७६९०० रुपये ठेवण्यात आली होती. पण आता कंपनीच्या या फोनच्या किमतीत २७ हजार रुपयांची कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा आयफोन आता ४९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच ही किंमत इतर ई-कॉमर्स संकेतस्थळांवरही अपडेट होईल. तसेच एक दिवसापूर्वीच लाँच झालेला नवा आयफोन भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतात आयफोन ११ च्या सुरुवातीच्या व्हेरिअंटची किंमत आता ६४९०० रुपये, आयफोन ११ प्रोच्या सुरुवातीच्या व्हेरिअंटची किंमत ९९९०० रुपये आणि आयफोन ११ प्रोमॅक्सच्या सुरुवातीच्या व्हेरिअंटची किंमत १,०९,९०० रुपये ठेवण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button