अहमदनगर : घरासमोरून गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना फटाके वाजवू नका घरातील लहान नात घाबरेल असे म्हणाल्याचा राग येवून जातीवाचक शिवीगाळ करत काठ्या, तलवार, लोखंडी पाईपने एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रंगनाथ बाबुराव बोरुडे (रा. आगडगाव, ता.नगर) यांच्या घरासमोरून गावातील गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील लोकांनी त्यांच्या घरासमोर फटाके वाजवले. तेव्हा बोरुडे यांनी तुम्ही घरासमोर फटाके वाजवू नका, माझी नात लहान आहे ती घाबरेल असे म्हटले.

याचा राग येऊन बबन आसाराम कराळे, भाऊ आसाराम कराळे, राधाकिसन भाऊ कराळे, प्रशांत महादेव गायकवाड, नवनाथ परसराम कराळे, पप्पू आसाराम गायकवाड, संदीप मळु गायकवाड, वैभव दत्तू पागिरे (सर्व रा. आगडगाव) यांनी बोरुडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत हातातील काठ्या, तलवार, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी रंगनाथ बोरुडे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- इंजीनियरिंगला ऍडमिशन हवंय ? स्वातंत्र्यापूर्वी स्थापित झालेल्या ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी
- ‘या’ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर मिळणार 9.10 टक्क्यांचे व्याज ! कोणत्या बँकेने आणली नवीन योजना? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! यावेळी ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, थकबाकीचाही लाभ मिळणार
- एलपीजी ग्राहकांसाठी कामाची बातमी! आता ‘या’ ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाही
- मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?