Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

वाघ आल्याची चर्चा; नागरिकांमध्ये घबराट

कर्जत : तालुक्यातील कुंभेफळ, नेटकेवाडी, कोरेगाव, बजरंगवाडी येथे वाघ आल्याची जोरदार चर्चा होत असून वनविभागाने कुंभेफळ येथे पिंजरा लावल्याने परिसरात घबराट पसरली आहे. लोकाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असला तरी याबाबत महसूल, पोलीस अशा शासकीय यंत्रणाना मात्र कोणतीच माहिती नाही.

याबाबत सोशल मीडियावर जोरदार पोस्ट फिरत आहेत. कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथे वाघ व त्याची दोन पिल्ले पाहिल्याची व तो आपल्या भागात दिसल्याच्या पोस्ट सोशल मीडियात फिरु लागल्या आहेत.

कोरेगाव जवळील रजपूत मळ्यात तर कधी नेटकेवाडीमध्ये हा वाघ आल्याची चर्चा होत असताना या वाघाबरोबर दोन पिल्ले असल्याचे बोलले जात आहे. ज्या काही लोकांनी असे मेसेज पाठवले आहेत त्यांना याबाबत विचारले असता त्यांना कोणतीही अधिकृत माहिती सांगता आली नाही.

तर मला माहिती आली व म्हणून मी पण ती फॉरवर्ड केली असे उत्तरे मिळत आहेत. सदर वाघ नेमका कोठे दिसला व कोणाला दिसला ? नेमका किती वाजता दिसला? याची कोणाकडेच उत्तरे नाहीत.

याशिवाय असा वाघ पाहिल्याचा फोटो, व्हिडिओही उपलब्ध नसल्यामुळे ही नक्कीच अफवा असल्याचे बोलले जात आहे. बजरंगवाडीचे प्रमुख अंगद रुपनर यांना विचारले असता त्यांनीही आपल्या गावाच्या परिसरात कोणालाही वाघ दिसला नसल्याचे सांगत ही अफवा असल्याला दुजोरा दिला. उगाच कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियातून ही पोस्ट फिरवत असल्याचे म्हटले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button